पाऊस कधीचा पडतो's image
1 min read

पाऊस कधीचा पडतो

Manik GodghateManik Godghate
0 Bookmarks 250 Reads0 Likes

पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने,
हलकेच जाग मज आली
दु:खाच्या मंद सुराने

डोळ्यांत उतरते पाणी
पाण्यावर डोळे फिरती,
रक्ताचा उडला पारा
या नितळ उतरणीवरतीपेटून कशी उजळेना
ही शुभ्र फुलांची ज्वाला,
तार्‍यांच्या प्रहरापाशी
पाऊस असा कोसळला

संदिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा,
माझ्याच किनार्‍यावरती
लाटांचा आज पहारा

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts