
Share0 Bookmarks 18 Reads0 Likes
वाट पाहती मज मन हळवे
एकांतात मी कसे हसावे..
आस त्या व्याकूळ क्षणाची
संगतीला आज 'थवे' बसावे..
जगणं मज नको आभासी
स्तब्ध मृगजळ धुसर व्हावे..
विहंगांसवें उंच आकाशी
वेग वाऱ्याने तरंगत न्यावे..
चिवचिवाट सारे विलय होऊन
निळसर नभी रूजूनी घ्यावे..
थव्यांच्या दिर्घ चर्चेत रंगुनी
धागे मनाची गुंतून जावे..
© Rushikesh kalokar
No posts
No posts
No posts
No posts
Comments