जीवनाशी संघर्ष's image
Share0 Bookmarks 15 Reads0 Likes

जीवनाशी संघर्ष करत चाललो

अशी माझी ही अवस्था

जो पर्यंत आयुष्य आहे

लिहित राहिल मी

कविता आणि कथा

डोळे ही होत आले कमजोर

ही माझी मोठी बाब

विचारांचा दिवा जळे हृदयी

आता मारू कुणावरी दाब

प्रसंग प्रत्येक वेळी बदलत

बदलती ती वेळ

आज नाही तर उद्या येईल

म्हातारपणाचा खेळ

आदर्शाची भावना माझ्या अंगी सदैव

तेच येईल संगती तेच माझे वैभव

कर्तव्य, निष्ठा, संपत्ति हीच माझी पुंजी

माझ्या कवितेत शब्दांचा मी धना पुंजी

- धनराज बाविस्कर



No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts