म्हणे आम्ही सच्चे देशभक्त ,राष्ट्रवादी's image
Love PoetryPoetry2 min read

म्हणे आम्ही सच्चे देशभक्त ,राष्ट्रवादी

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske March 29, 2022
Share0 Bookmarks 52 Reads0 Likes

म्हणे आम्ही सच्चे देशभक्त ,राष्ट्रवादी

कळली तुमची शक्कल अन अक्कल

नडले तुमचे भिकारचोट पुढारपण

निर्लज्जपणे विचारता सत्त्तर सालात काय केले ?


होते नव्हते विकून फुकू पाहणा-यानो 

फक्त एवढं लक्षात ठेवा जनता दूधखुळी नाही

जेवढी तुम्ही समजता ,डोक्यावर घेऊन नाचताहेत

तेच उद्या पायदळी तुडवतील अजून थोडं थांबा


इथून तिथून येड्यांची जत्रा अन लबाड सतरा 

सारे कसे नतमस्तक ,त्यांचेच चरणी समर्पित

टोळबहिरे ,डोमकावळे अन संधीसाधू बगळे

सत्य तोंड लपवी अन असत्य जगभर फिरून आले


कालपर्यंतचे कपाळकरंटे आज नकटे कारभारी झाले

आपली अक्कल पाजळु लागले ,होत्याचे नव्हते झाले कसे

बिनदिक्कत बिनधास्त ते आमच्या छाताडावर नाचू लागले

बिनदांडीचे चमचे अन सुपारी घेऊन वाजवणारे मीडियावाले 


नसती उठाठेव अन देवघेव चालूच खुल्या दिल्याने

तू कर मारल्यासारखं अन मी करतो रडल्यासारखं

इथून - तिथून सारे कसे ठोसर भिकारी ,संधीसाधू वाटमारे

देव पाहावयास गेले अन देवची होऊनि गेले ... कसे ?

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts