
अशा सांजवेळी आठवणींची पाखरे
गर्दी करतात मनःपटलावर सदोदित
भारावलेले ते क्षण निसटलेले कधीचे
जीवघेणे सुंदर मनमोहक हवेहवेसे
सारं काही अगदी जसंच्या तसंच पण ...
फक्त तू नाहीस यावेळी रुसण्यासाठी
सुख - दुःखात सोबत करण्यासाठी
सात जन्माची सोबत न केल्याची खंतही
नकोसे ते जाळून किंवा पुरून टाकू
मुळासकट उपटून फेकू म्हटले तरी
वेड मन मानायलाच तयार नसत
गेलेली व्यक्ती नसते परतत कधी
तू नेहमी म्हणायचीस सांभाळ स्वतःला
आम्हा बायकांचा जन्म म्हणजे पाळीव प्राणी
खुंट्याला बांधलं तिंथं गपगुमान राहायचं
तुमचं बरं बुवा पटलं त ठीक नाही तर जय रामजी की
जाताना किती सहज म्हणालीस ग
आता तुझा -माझा मार्ग वेगळा रे
फार नको मनाला लावून घेऊस
रडवेली होऊन म्हणालीस सांभाळ स्वतःला
आजही आठवत लख्ख सारं तू निघून जाताना
मी शिळा होऊन थिजलेलो स्तब्ध उभा होतो
किती तरी वेळ तसाच पाठमोरी आकृतीकडे पाहत
वाटलं होत कधी तरी विसरेन मी तुला कदाचित
No posts
No posts
No posts
No posts
Comments