
तू गेलीसच शेवटी अधांतरी सोडून .....
मी कोण अडवणार तुला ? सांग ना
कसा अन कुठपर्यंत ? थकलो शेवटी
तू केलीस मनमानी सदा नी कदा दरवेळी
तू माझ्यासाठी कायमच अनाकलनीय कोडं होतीस
पण माझ्या बाळाचं मायेचं पांघरून छत्रछाया निसंदेह
सात फेऱ्यांचे वचन मी ही नाही निभावू शकलो ग खरंच
तुझ्या गुणदोषांसहित स्वीकारलं होत तू मला पण मी काय केलं ?
मी तरी काय करू ग मी असं फाटका गरिबी पाचवीला पुजलेली
कुठून देणार होतो बंगला गाडी नोकर चाकर सर्वकाही ?
तू स्वभावानं गोड होतीस पण आजारपणानं हट्टी चिडचिडी झालीस
माझं ही चुकलंच मी तुझं औषधपाणी खर्च भागवू शकलो नाही कधीच
किती किती स्वप्न रंगवली असशील तू उमरा माझा ओलांडताना
किती खुश होतीस तू स्वीकारलं होतं आम्हाला गरिबीसकट
तिथेच तू चुकलीस ग अन भुरकट गेलीस आमच्या दरिद्री आयुष्यात
राख रांगोळी तुझ्या सुखी संसाराच्या स्वप्नांची अपेक्षांची तेंव्हाच .....
तुझी मनाची घालमेल सासरी येण्याची धडपड आर्त हाक प्रेम
मला कळत होत सारं पण तुझी काळजी घेणारी कुठून आणणार होतो
तुझं फोनवर बोलणं ऐकून बरही वाटत होत काळीज चिरून जात होत
तुझे प्रत्येक शब्द पटत होते कधी भावविभोर होऊन एकांतात रडतो होतो ग
तू लग्न होऊन घरी आलीस सगळ्यात मिसळून गेली होतीस
शक्य तितके समजून घेतले ही पण दोघांनी दशकभर पण
संसार वेलीवर बहरणार चिमुकलही बघता - बघता मोठं झालं
प्रेमळ समंजस माहेरची माणसं असताना देखील तू निर्दयीपणे सोडून गेलीस
एकवेळ माझ्यावर रुसणं स्वाभावीक होत मी कमी पडलो तुला दिलेली वचन निभावण्यात
पण चिमुरड्यावर का हा अन्याय ? असं अचानक जीवनयात्रा संपवताना त्याचा निरागस चेहरा
तुला का नाही आठवला ? का फिरली नाहीस माघारी प्रेमळ भाऊ अण्णा अक्का वाहिनीसाठी
मी एवढं वर्ष राहीन माहेरी मग दोघेही येऊ म्हणाली होतीस ना मला माझीही मूकसंमती होतीच ना<
No posts
No posts
No posts
No posts
Comments