कुठे कुठे शोधू तुला ?'s image
Poetry1 min read

कुठे कुठे शोधू तुला ?

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske May 23, 2022
Share0 Bookmarks 47 Reads2 Likes

 

शोधले मी इथे तिथे दूरच्या प्रदेशात

मना मनात ,झिजलेल्या देहात

तुजविण आसमंत हा सुना सुना 

 कुठे कुठे शोधू तुला ?

 

शोधले मी चर्च मंदिर मशीद गिरजाघरात

झाडां - माडांत अन पाना फुलांत सुद्धा

प्राणी पक्षी अन सरपटणाऱ्या किडयामुंग्यात

कुठे कुठे शोधू तुला ?

 

ऐकलं होत कणा कणात तू आहेस

चराचर सृष्टीत व्यापून राहिलास पण

हल्ली तू ही अपडेट झालास म्हणे

कुठे कुठे शोधू तुला ?

 

म्हणे तुझं मन आता कुठेच कसे लागत नाही

तिन्ही लोकी भटकून सुद्धा तुझं काही भागत नाही

तू तूर नियंता ना तुझ्या मर्जीशिवाय पानही हालत नाही

 कुठे कुठे शोधू तुला ?

 

तुझे शाप उ: शाप आशीर्वाद व्यर्थ कसे ?

की तुही कंटाळास पुन्हा पुन्हा जन्म घेऊन

तू ही थकलास अधर्मी लोकांचा नायनाट करून 

कुठे कुठे शोधू तुला ?

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts