कविता's image
Share0 Bookmarks 52 Reads0 Likes

प्रेम माया वात्सल्य सहानुभूती 

करूणा दुःख वेदना संवेदना 

रसिक वाचकाच्या मनाला भावते

रुचते सैरभैर करते वेडावते कविता ,


नैराश्य नकारात्मकता न्यूनता 

भरलेल्या जगास मार्गदर्शक कविता 

आशा अभिलाषा जागवते कविता 

रसिक मनाला खटकते कविता 


गतकाळातील समग्र घटीत घटनांचा आलेख 

वर्तमानात जगताना अन भविष्याचा वेध घेताना 

सुकर जगण्याचा वास्तव आरसा असते कविता 

अमानुषता अराजकता अश्लीलताही टिपते कविता 


कविता मन डोलते सुखावते हेलावते 

सत्य सुंदर मांगल्याचं गाणं गाते कविता 

इतिहासाचे स्मरण विस्मरण पुनर्लेखन कविता 

दुःखावर हुळूवार फुंकर घालते कविता 


राग लोभ द्वेष मत्सर मोह माया कविता 

टीचभर पोटासाठी झिजणारी काया कविता 

कुटुंब समाज देशासाठी प्राणाची आहुती कविता 

चराचर सृष्टीची विलोभनीय दृश्य महती कविता

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts