हल्ली माणूस कायम's image
Poetry2 min read

हल्ली माणूस कायम

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske March 19, 2022
Share0 Bookmarks 23 Reads0 Likes

हल्ली माणूस कायम चिंतातूर

आतून- आतून भेदरलेला दिसतो

का कुणास ठाऊक ? गर्दीतही

एकटा -एकटा उदास भासतो

 

हल्ली माणूस कायम कार्यमग्न

घड्याळाच्या काट्यावर धावत असतो

आख्या जगावर अधिराज्य गाजवू पाहतो

पण स्वत:च्याच वर्तुळात बंदिस्त होतो

 

हल्ली माणूस कायम धडपडतो

घरात - दारात ,बाजारात उगाच

चिडचिड करतो तडफडत असतो

स्वतःवरच खुश होतो कधी रागावतो

 

हल्ली माणूस कायम सहनशील होतो

अन्याय ,अत्याचार अनेक समस्यांना

गप- गुमान तोंड देतो,मन मारून जगतो

ना कुणाला दोष देतो ना कुठली जबाबदारी घेतो

 

हल्ली माणूस कायम आत्मकेंद्रित भासतो

आपली बायको पोर , घरसंसार जग मानतो

समाज, देश यांच्याशी त्याला काही देणंघेणं नसत

 प्रत्येकवेळी तडजोड करून तो आत्मसंतुष्ट राहतो 

 

हल्ली माणूस नेहमीसारखा वाटत नाही

मित्रांना कधीमधी विनाकारण खेटत नाही

धाय मोकलून गळ्यात कुणाच्या पडत नाही   

खळखळून हसत नाही यंत्रागत राबत असतो

 

हल्ली माणूस माणसा सारखा वागत नाही

कडाकडा भांडत नाही की कुणावरही रुसत नाही

सारं काही ठरल्याप्रमाणे एक अनिवार्य असल्यागत

स्वतःच्याच घरात परक्यासारखा वागतो असतो 

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts