
Share0 Bookmarks 10 Reads0 Likes
चंद्रात आहे डाग तरी
भाळल्या चांदण्या किती ?
लख्ख प्रकाशात उजळतो जरी
परावलंबीच ठरतो तो ही
चंद्रात आहे डाग तरी
त्याला का बरे अन कशाची
वाटतो चुमुकल्यांचा चांदोबा
सूर्य प्रकाशाचा तो तर ऐतोबा
चंद्रात आहे डाग तरी
अभिमानाने मिरवतो नभी
निर्लाज्जासारखं वागतो तो
लागतेच ना ग्रहण त्यालाही
चंद्रात आहे डाग तरी
प्रियकर तो भाबडा वाटतो
संसार थाटतो मोडतो दरवेळी
स्वयं प्रकाशित नसतानाही
चंद्रात आहे डाग तरी
तुजविण आकाशगंगा अधुरी
गृहीत धरतो ढगाआड लपतो
वाकोल्या दाखवून लुकछीपी खेळतो
No posts
No posts
No posts
No posts
Comments