बायको's image
Share0 Bookmarks 103 Reads0 Likes

बायको- बायको थोडीशी सायको 

थोडीसी हळवी ,भांडखोर जराशी 

तोंडाचा पट्टा , पोट्ट्यानां रट्टा 

झाडलोट ,रांधा वाढ उष्ट काढा  बायको- बायको थोडीशी हट्टी 

लांबलचक भाषण ,कुकरची शिट्टी  

तीच आई तीच शाळेतली बाई अन 

विराणी जीवनसंगीत अन गीत अंगाई बायको- बायको थोडीशी मायावी 

असून अडचण नसून खोळंबा 

जणू अवघड ठिकाणचं दुखणं 

सांगतही येईना अन सहनही होईना 


बायको- बायको रोती हो कायको 

माझ सारं तुझंच गडे, तुझ तुला लखलाभ 

चालू असत तुझं सदा ऐकलं का ... अहो ... 

विचारावं तुला त्याशिवाय मी दुसरं काही केलं का ? 


बायको म्हणजे जगातलंआठवं आश्चर्य 

गिनीजबुकातून सारेच थकले उपाय शोधून 

तिजवीण घरदार अंगण सुने -सुने वाटते 

असता घर दारी संसारी दरवळे सुगंधापरी भासते 

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts