त्या व्याकुळ संध्यासमयी's image
1 min read

त्या व्याकुळ संध्यासमयी

Manik GodghateManik Godghate
0 Bookmarks 461 Reads0 Likes

त्या व्याकुळ संध्यासमयी
शब्दांचा जीव वितळतो,
डोळ्यांत कुणाच्या क्षितिजे
मी अपुले हात उजळतो

तू आठवणींतुन माझ्या
कधी रंगीत वाट पसरशी,
अंधार-व्रताची समई
कधी असते माझ्यापाशी

पदराला बांधुन स्वप्‍ने
तू एकट संध्यासमयी,
तुकयाच्या हातांमधला
मी अभंग उचलुन घेईतू मला कुशीला घ्यावे
अंधार हळू ढवळावा,
संन्यस्त सुखाच्या काठी
वळिवाचा पाऊस यावा

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts