भर उन्हांत बसली धरुन सावली गुरं's image
1 min read

भर उन्हांत बसली धरुन सावली गुरं

Gajanan Digambar MadgulkarGajanan Digambar Madgulkar
0 Bookmarks 228 Reads0 Likes

भर उन्हांत बसली धरुन सावली गुरं
न्हाइ चिंता त्यांची तिन्ही सांजपातुर
चला दोघं मिळुनी चढू टेकडीवर
चढताचढता धरा हात की वाट नसे रुंद
जाळीमंदी पिकली करवंद

तुम्ही बाळपासून जिवांचं लई मैतर
ही तरुणपणातील बाळपणाची लहर
कुणी बघत नाही तो चला गडे लौकर
आंबटगोडी चाखु वाटते पुरवा की छंद
जाळीमंदी पिकली करवंदमज लाज वाटते सांगाया ते धनी
घ्या तुमचं तुम्ही जरा तरी समजुनी
पाळणा उद्याचा हलतो माझ्या मनी
दर्‍या टेकड्या चला धुंडुया होउनी बेबंद
जाळीमंदी पिकली करवंद

 

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts