भंगु दे काठिन्य माझे's image
1 min read

भंगु दे काठिन्य माझे

Bal Sitaram MardhekarBal Sitaram Mardhekar
0 Bookmarks 5937 Reads0 Likes

भंगु दे काठिन्य माझे
भंगु दे काठिन्य माझे
आम्ल जाउ दे मनीचे

येऊ दे वाणीत माझ्या
सूर तुझ्या आवडीचे

धैर्य दे अन नम्रता दे
पाहण्या जे जे पहाणे
वाकू दे बुध्दीस माझ्या
तप्त पोलादाप्रमाणेजाऊ दे ‘कार्पण्य’ ‘मी’ चे
दे धरु सर्वांस पोटी
भावनेला येऊ देगा
शास्त्र काट्याची कसोटी

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts