त्या तरू-तळी's image
Share0 Bookmarks 0 Reads0 Likes

त्या तरू-तळी, एका सायंकाळी,

गुंफित बसले, वेड्या आठवणी.

बालपणीचे, 

सवंगड्यां बरोबरचे, 

ते खेळ खुळे, 

पकडा-पकडी, 

तर कधी लपंडावाचे.

कधी रुसणे-फुगणे,

कधी धड-पडणे, कधी रडणे,

कधी विसरून सगळे,

खुदकन हसणे.

आठवतात त्या गोजिरवाण्या, 

निर्मळ, भोळ्या आठवणी.


त्या तरू-तळी, एका सायंकाळी,

गुंफित बसले, वेड्या आठवणी.

ते दिवस तारुण्याचे,

स्वप्न नव्या-नवलाई चे.

ती आस उंच भरारी ची,

ती जिद्द जग जिंकण्याची,

ते चुकणे, ते शिकणे,

ते अलगद कोषातून बाहेर पडणे.

ती तळमळ स्वतःच्या ओळखीची.

आठवतात त्या गोजिरवाण्या, 

निर्मळ भोळ्या आठवणी,

त्या तरू-तळी, एका सायंकाळी,

गुंफित बसले, वेड्या आठवणी.

सम्रिता®

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts