
हो गरज आहे समाज बदलण्याची,
मानसिकतेत बदल घडवण्याची,
आज ही होतात बलात्कार,
त्या नजरा चिकटतात अंगावरती,
जणु हैवान स्त्रियांच्या अवती भवती,
लचके तोडूनी शरीराचे,
हवसेच्या आहारी जातात सैतानाचे,
मुलास शिकवावे परस्त्रित बघण्यास ताई-आई,
करावा विचार तुला जन्म देणारी सुद्धा आहे एक बाई,
अंगाची होते त्यांच्या लाही लाही,
नाही ही स्त्री सुरक्षित या समाज कंटकांच्या पाई,
हुंदके देऊन रडतात पिडीतेचे वडील-आई,
या समाजात माणुसकी नाही?
बलात्काराच्या खटल्यात का करत नाही घाई?
जीव जातो निष्पाप मुलीचा,
अजून कोणता पुरावा हवा?
न्यायपालिकेने जणास आता तरी न्याय द्यावा,
जागृत करुनी स्त्री,
तिच्यात रणरागिणी जागवावी,
हातातूनी तिच्या वाघनखे उगवावी,
कोथळा फाडावा नीच मानसिकतेचा,
सूर्य उगवावा प्रेम समतेचा,
उजेड पडावा मानवतेचा,
अन् अंधकार दूर व्हावा समाजाचा.
- समीर
No posts
No posts
No posts
No posts
Comments