
Share1 Bookmarks 108 Reads1 Likes
पळतोस काय वेड्या जगायला शिक,
ध्येयाकडे लक्ष असुदे ,
पण जरा अजू बाजूला बघायला शिक,
हो आहे भविष्याची चिंता,
वर्तमानात सुद्धा राहायला शिक,
जगतोस दुसऱ्यांसाठी ठीक आहे,
जरा स्वतःसाठी पण जगायला शिक,
नको राहुस कोंडून,
मनासारखं वागायला शिक,
आनंद आहे प्रत्येक गोष्टीत,
तो हुडकायला शिक,
दुःख आहे जीवनात,
त्यावर मात करायला शिक,
अपयशामुळे पडलास?
चल परत उठायला शिक,
थांब जरा, वारा बघ कसा सुटलाय!
मोकळा श्वास घ्यायला शिक,
पळतोस काय वेड्या जगायला शिक.
- समीर
No posts
No posts
No posts
No posts
Comments