थांब's image
Share0 Bookmarks 22 Reads0 Likes

त्या रात्री अचानक जोरात पाऊस आला आणि तेवढ्या वेगाने जाऊ लागला. मी त्याला म्हणाले थांब.


मी म्हणाले थांब, मला अजून चिंब भिजायचं आहे.

त्या आठवणींच्या कुशीत रुजयचं आहे.


तुझ्या शितोंड्याने मन बहरून आले

तर आठवणींच्या आलोव्यामध्ये मन नाहून निघाले


आत्ता तर रात्री चा रंग चढतोय, अन् तुला रे कसली घाई

ऊबदार आठवणीं माझे पांघरूण अन् ती माझी रजाई


ह्या रात्रीच्या निरव शांततेत तुझाच तो आवाज

अन मनाच्या कल्लोळाला प्रेमाचा आभास


सोबत आणलेल्या ह्या आठवणी परत नेशील का

स्वच्छ आकाशातले तारे माझ्या मनात ही दिसतील का


कदाचीत ह्या आठवणी आहेत पुढच्या आपेक्षांचा खांब

बरं तू आता जा पण पुढच्या वेळेस थोडा अजून थांब.

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts