
Share0 Bookmarks 36 Reads0 Likes
नको येऊ पुन्हा
-- Pranil Gamre
तू येता परतूनी साऱ्या आठवणी ताज्या होतील
नको येऊ पून्हा जीवनी त्या आठवणी नव्या अपेक्षा देतील
आता नको पुन्हा तुझी वाट पाहत राहणे
नकोयत मला तुझे कुठलेच बहाणे
नकोयत कुठलेच वचन जे पूर्ण करता नाहीं येणार
जे पुन्हा माझ्या नयनी असवांचं कारण होणार
तुझ्या मधाळ बोलण्यात मला पुन्हा नाहीं भुलून जायचं
थकलो आता नाहीं कुठल्याच विवादात मला राहायचं
माझ्या चेहेऱ्यावरचं हसू तुझ्यामुळे हरवलं
तुझ्या जाण्याने मी माझ्यातल्या मला ही गमावलं
तुझ्या प्रेमाच्या झूल्यात आता मी नाहीं बसणार
तुझ्या भुलथाप्यात आता मी पुन्हा नाहीं फसणार
नको येऊ पुन्हा जीवनी, मी स्वतःला सावरत आलीये
विसरलेली माझी ओळख मला पुन्हा झालीये
No posts
No posts
No posts
No posts
Comments