कातरवेळ's image
Share0 Bookmarks 147 Reads1 Likes

कातरवेळ मला नेहमीच व्याकुळ करते

विझणारे रविकिरण 

आणि व्यथेच्या सागरात

वेदनेच्या क्षितिजाला स्पर्शुन 

संपत जाणारा सूर्य,

माझे काजळ ओलावून जातो..

...आणि मग

आणि मग मिरेची सारी आर्तता 

माझ्या शब्दात उतरते

त्यात तुझ्या शब्दांची मांदियाळी

काळीज व्यापुन टाकते..

मला कातर कातर करून जाते

...माझ्याच काळजासारखी !


- किरण के.

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts