
संघर्ष फक्त मनुष्याच्या जीवनामध्ये नाहीतर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष असतचं, उदाहरणार्थ प्रत्येक वृक्षाला सुद्धा स्वतःच्या आयुष्यामध्ये वाईट परिस्थितीचा सामना करून संघर्ष करावचं लागतो.
जेव्हा ऋतू बदलतो आणि कळकळता उन्हाळा वृक्षाला कष्ट देतो त्यावेळेस ज्या वेदना होतात ना तो वृक्षच समजतो कारण त्या संघर्ष काळात वृक्षाला सावरणारा किंवा साथ देणारा कोणीच नसतो त्यावेळेस वृक्षाला एकट स्वतः संघर्ष करावा लागतो. तरीपण वृक्ष त्याच्या संघर्ष काळात न डगमगता खंबीरपणे उभा राहतो कोणालाही दोष न देता चांगल्या दिवसांची वाट बघतो पण त्यावेळेस तो स्वतःला कधी नैराश्य व निराश न होऊ देता यश मिळेपर्यंत परिस्थितीला तोंड देऊन सतत संघर्ष करतो.
वृक्ष नेहमी नऊ महिने शीतल, टवटवीत आणि प्रफुल्लित राहतो. मग ऋतू बदलतो तीन-चार महिने पुन्हा परिस्थितीला तोंड द्यावा लागतो, संघर्ष करावं लागतो आणि अंगावरती उणाचे चटके सहन करावं लागतो.
वृक्ष ज्यावेळेस परिस्थितीचा तोंड देते ऊनाचे चटके सहन करतो त्यावेळेस वृक्षाला शितल, टवटवीत आणि प्रफुल्लित ठेवणारे पान, फुलं आणि फळे सुद्धा त्याच्या सोबत नसतात आणि जेव्हा वृक्ष तीन-चार महिने संघर्ष करून यश मिळवतो त्याच वेळेस वृक्षाला पान, फुलं आणि फळे येतात. तेव्हाच वृक्षाला बहुदा नऊ महिने आनंदात जगायला मिळतो.
ही वस्तुस्थिती आहे की आपल्या आयुष्यामध्ये वाईट परिस्थिती असते त्यावेळेस बाहेरचे तर सोडाच आजकालच्या काळात कधी-कधी आपले सुद्धा सोबत नसतात मग जीवनामध्ये म्हणा की परिस्थितीमध्ये म्हणा जगणं सोपं करण्यासाठी थोडं संयम ठेवून काही सहन करून आणि अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करून वाईट परिस्थितीला मात देऊन, संघर्ष करून आयुष्य किंवा जगणं सोपं करावं लागतं.
No posts
No posts
No posts
No posts
Comments