प्रेम वाट's image
Share0 Bookmarks 135 Reads0 Likes

एका लग्न मंडपात हृदय सोडुन आलो

कळत नकळत प्रेमाचं एक बीज रोपून आलो


प्रेम गंध स्पर्श करीत हृदयाला ती जवळ नसताना

तीचा चेहरा हृदयातछपला लग्न मंडपात असताना


अवचित भेट होऊन तीच्याशी लाजिरवाणं झालं अंग

तोंडात शब्द अडखळून कोरा झाला अंतरंग


प्रभात संध्या क्षणा क्षणात तीच्या प्रेम गंधात हरवलो

डोळ्यांपुढे येताच स्मितहास्य देत तीच्या बोलीत गुंतलो


संदेश पाठवलं प्रथमच तू खूप आवडतोय मला

तिचं उत्तर आलं हो का तुझी आठवण येतोय मला


हे सगळं ऐकून हृदयात आनंदाचा जोरदार वारा सुटला

पावडरचं सारवण करून चेहरा दर्पणात डोकावू लागला


आता प्रश्न पडला मनाला प्रेम कसं व्यक्त करू तिच्याशी

पुन्हा दुसरा संदेश पाठवलं मला प्रेम आहे तुझ्याशी


तिचं पुन्हा उत्तर आलं हा प्रेम नाही आकर्षण असतो

प्रेम वगैरे काही नसतं मैत्रीचं नातं कायम ठेवू शकतो


हे ऐकताच त्या क्षणी तोंडात शब्द चावून जीव स्तब्ध झालं

प्रेमाचं गंध एका क्षणात नाहीसा होऊन प्रेमगंध नष्ट झालं


काही वेळ नैराशान जखडून जीवाला पोखर केलंय

कामावरचं मन काही वेळे पुरता नाहीसा झालंय


स्मरणात आलं मैत्रीचं नातं अजूनही कायम आहे

तिला क्षमा मागताच म्हटलं आपल्या मैत्रीच्या

नात्याची ही नवीन सुरुवात आहे

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts