प्रेम's image
Share1 Bookmarks 37 Reads1 Likes

बऱ्याचदा आपण बाहेरील सौंदर्याला आकर्षित होऊन प्रेम समजतो. आकर्षित होणे मनुष्याचा स्वभाव तर आहे. पण ह्या सौंदर्यतेचा आकर्षण म्हणजे प्रेम नसतं, बाहेरील सौंदर्य हा आपल्या डोळ्यांवर पडदा ओढतो. त्यामुळे आपल्याला अंतरात्मेतील सकारात्मकता म्हणजेच आतील सौंदर्य दिसत नाही. जेव्हा आपण बाहेरील सौंदर्यात न बुडता, आतील सौंदर्याला आकर्षित होऊन सकारात्मक विचारांना प्रभावित होतो. एकमेकांच्या विचारांचा अर्थबोध होऊन आपुलकीचं व मैत्रीचं संबंध जुडतो किंवा प्रस्थापित होतो. मैत्रीमध्ये एकमेकांची काळजी घ्यायला लागतो त्या काळजी मधूनच प्रेमाचा जन्म होतो.


प्रेम हा सुगंधा प्रमाणे आहे, जो आपण एखाद्याच्या अंतकरणांमध्ये वेळोवेळी किंवा एखाद्या विशिष्ट वेळेस पसरवतो, जणू काही आपण एखाद्याच्या हृदयामध्ये हळूहळू प्रेमाचं सुगंधी द्रव्यांचा साठा तयार करतो.


प्रेमाचा सुगंध हा विश्वासाच्या फुलावर अवलंबून असतो. विश्वासाचा फुलच वेळोवेळी प्रेमाला सुगंधित करत असतो आणि जर का विश्वासाचा फुल कोमेजला तर प्रेमाचा सुगंध नाहीसा होतो. प्रेमाचा सुगंध आयुष्यात एकसारखा किंवा समान राहणार नाही तो वेळप्रसंगी कमी जास्त राहणारच पण नेहमीचा टिकवून ठेवण्यासाठी विश्वासाच्या फुलाला न चुकता पाणी घालून टवटवीत ठेवावं लागेल तरच प्रेम निर्विघ्न राहणार... प्रेम हा अनपेक्षित असते जर का प्रेम अनपेक्षित नसेल तर त्याला प्रेम म्हणता येणार नाही.

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts