बहिणीचं नातं's image
Article4 min read

बहिणीचं नातं

Chandrakant KannakeChandrakant Kannake March 16, 2023
Share0 Bookmarks 56 Reads0 Likes

मला असं वाटतं की मी आयुष्यामध्ये सगळं काही मिळवणार आणि स्वतःच्या मनाचं करणार पण अशी एक गोष्ट आहे जी मी कधीच मिळवू किंवा प्राप्त करू शकणार नाही.


मी काही कुटुंबामध्ये बहिण–भावाला हसत खेळत बघत असताना मला पण वाटतो की, स्वतःच्या बहिणी बरोबर हसत खेळत मी लहान याचा मोठा का नाही झालो ? नशीबवान आहेत ती व्यक्ती जे बहिणी बरोबर लहाण्याचं मोठे झाले. मला बहीण नाही पण माझ्या नातेवाईकांमधील किंवा माझ्या ज्येष्ठ आई–वडिलांच्या मुलींनी मला कधीचं बहिणीची कमतरता भासू दिली नाही आणि सामोर सुद्धा भासू देणार नाही याची मला खात्री आहे


प्रत्येक रक्षाबंधनाच्या सणाला, माझ्या हाताच्या मनगटाला राखी बांधून बहिण–भावाच्या नात्याची गाठ रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट करतो, कधीकाळी माझ्या जवळ नसतानाही राखी टपालच्या (Post office) माध्यमातून पाठवतो. माझी एक बहिण प्रत्यक्षात राखी बांधण्यास येत नाही पण ती प्रत्येक वेळेस राखी पाठवतो, आता गेले बहुदा दोन-तीन वर्षे टपालच्या माध्यमातून काही कारणास्थ राखी येत नाही आहे तरी पण माझ्या बहिणीने आपलं कर्तव्य सोडलं नाही कारण मी राखी पाठवत होती पाठवत आहे आणि नेहमी पाठवणार अशी तिची भावना किंवा व्यक्तिगत विचार असतील असे मला वाटते. राखी म्हणजे नुसतं कापसा पासून बनलेले सामान्य धागा नाही तर बहिणी–भावाच्या नात्याची ओळख असतो असं मला वाटतं आणि लिफाफ्यामध्ये राखी बरोबरच एक कागदाचा चीटोरा असतो पण तो माझ्यासाठी फक्त कागदाचा एक लहान चीटोरा नसून, मी तुझ्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभी राहून रक्षा करणार हा अंतर्भाव तो कागदाचा चीटोरा दर्शवितो आहे कारण त्या कागदावर निळ्या–काड्या शाईने नुसतं अक्षर लिहिलेलं नाही तर माझ्या बहिणीच्या भावना माझ्या आयुष्यावर कोरलेल्या आहेत, जे मी शेवटच्या श्वासापर्यंत कधीच नाहीसे होऊ देणार नाही, त्या भावना मी आजही जपून ठेवलेले आहेत आणि नेहमी जपून ठेवणार कारण ती बहीण तुम्हाला पाठीशी नेहमी खंबीरपणे उभी राहून रक्षा करणार म्हणून वचन देते. भावाचंही सुद्धा कर्तव्य आहे की त्याने अनपेक्षित साथ दिला पाहिजे आणि बहिणीच्या भावनांचा सन्मान करून जपून ठेवलं पाहिजेत असे मला वाटते.


एक वर्षी दिवाळी, भाई दूज साजरा करण्यासाठी माझ्या बहिणीला आणि तिच्या बहुदा अर्धा-एक वर्षाच्या चिमुकल्या बाळाला भेटण्यास बहुदा चार-पाच दिवसांसाठी स्वप्नांची नगरी म्हणून ओळखले जाणाऱ्या शहरी गेलो. भाई-दूजच्या दिवशी संध्याकाळी माझ्या बहिणीने द्वीप प्रज्वलित केलं, माझ्या माथ्याला टिळक लावून मला ओवाळलं, स्वतःच्या हाताने मिठाई चारून गोड तोंड केलं आणि मी चरणस्पर्श केलं त्याचं क्षणी चेहऱ्यावर भावना न दर्शवता अंतर्मनातून खुप भावुक झालो आणि त्याच वेळेस माझ्या अंतर्मनाने ओरडून–ओरडून मला सांगितलं की तू आयुष्यामध्ये सगळं काही आपल्या मनाचं करणार किंवा सगळं काही मिळवणार पण बहिणी बरोबर बालपण आता कधीच जगू शकणार नाही कारण बहिणी बरोबर बालपण जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात बालपणाचा एकच कालावधी असतो, हे ऐकताच माझे डोळे ओलेचिंब होऊ लागले कुणालाही न कळत हाताच्या कुशीमध्ये ओले चिंब डोळे पुसले, स्वतःच्या मनाला सावरलं आणि चेहऱ्यावर खोटारड्या स्मित हास्याचा पडदा ओढला.

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts