
जेव्हापासून शिक्षणाच्या वाटेला लागलं, तेव्हापासून आजपर्यंत मला कुटल्याही प्रकारचं प्रमाणपत्र मिळाला नाही किंवा कोणत्या कामाचं कौतुक झालं नाही आणि याचं दोष मी परिस्थीतीला, वेळेला आणि कोणत्याही व्यक्तीला किंवा नशिबाला नाही देत तर मी स्वतःच दोष मानतो आणि मी या गोष्टींबद्दल कधी निराश झालं नाही किंवा कोणत्या प्रकारचं टेन्शन घेतलं नाही.
कारण मी नेहमी एक विचार घेऊन चालतो की "जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय."
मला आयुष्यामध्ये काय करायचं आहे ? हे ज्या वेळेवर कळायला पाहिजे होतं त्या वेळेवर मला नाही कळलं तर जेव्हा मी ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षाला होतो त्यावेळेस मला कळलं की नेमकं मला काय करायचं आहे ? याचं कारण म्हणजे माझ्या आवडीच्या क्षेत्राबद्दल दहाव्या वर्गात असताना किंवा बाराव्या वर्गात असताना मला मार्गदर्शनचं मिळू शकला नाही, आणि जर का वेळेवर माझ्या आवडीच्या क्षेत्राबद्दल मार्गदर्शन मिळाला असता तर मी यशाच्या शिखरावर चढत राहिलो असतो.
पण या गोष्टीचा मला पश्चाताप नाहीं, कारण मी ह्या दृष्टिकोनातून बघितलं की काहीतरी वेगळं, नवीन शिकण्याची संधी मिळाली आहे मला.
कधी दुसऱ्या मुलांप्रमाणे परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ शकलो नाही पण मी माझ्या एखाद्या आवडीच्या क्षेत्रात नक्कीच यश मिळवणार आणि नाव मोठं करणार मला याची खात्री आहे. फक्त एखाद्या क्षेत्राचा प्रशिक्षण घेत असताना माझ्यावर विश्वास ठेवा आणि तेवढाच विश्वास माझ्या संघर्षाच्या काळात ठेवलं तर मला यशाच्या शिखरावर चढत्या वेळी कुठल्याही प्रकारच्या अळथळ्यांशी संघर्ष करण्याची शक्ती मिळेल कारण माझं व्यक्तिगत असं मत आहे की खूप वेळेपर्यंत जर का एकटेपणात असलं तर तो एकटेपणा व्यक्तीला आतून गिळत जातो. आणि कधी मी यशाच्या शिखरावर चढत असताना पायला ठेच लागून जर का खाली पडलो तर मला तेव्हढी पीडा होणार नाही कारण मला असं वाटणार की माझ्या पाठीवर थाप देऊन मला उभा करणारं आपल कोणीतरी आहे.
मला कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही किंवा कोणत्या क्षेत्राचा माझ्याकडे खूपसा अनुभव नाही पण मात्र परिस्थितीने जीवन कसं जगायचं हे नक्की शिकवलं आहे.
No posts
No posts
No posts
No posts
Comments