अनुभव एकटेपणाचा व समूहाचा's image
Article5 min read

अनुभव एकटेपणाचा व समूहाचा

Chandrakant KannakeChandrakant Kannake February 24, 2023
Share0 Bookmarks 50 Reads0 Likes

मी जेव्हा महाविद्यालयांमध्ये ग्रॅज्युएशन करत असताना माझे फारसे मित्र नव्हते कारण तेव्हा मी महाविद्यालयांमध्ये किंवा वर्गात नवीन विद्यार्थी होतो. त्यावेळेस नुकताच जग कोरोना काळातून बाहेर आलेला होता. मुलं-मुली कॉलेजमध्ये खूप कमी यायचे, त्यावेळापासून मला हळू-हळू एकटेपणा त्रास द्यायला लागला होता.

एकटेपणामुळे कोणत्या शालेय अभ्यासामध्ये किंवा घरगुती कामांमध्ये व्यवस्थित माझे मन नव्हता लागत म्हणजेच मला कुठलेही काम करायचं आवडत नव्हतं असं होत असताना मला दिवस-रात्र झोप जास्त प्रमाणात यायची आणि आडस किंवा झोप माझ्यावर स्वार झालेलं आहे असा मला वाटायचा.

मला मोबाईलचे दुष्परिणाम माहीत असतानाही एकटेपणा दूर करण्यासाठी मी खूप जास्त मोबाईलचा अतिवापर करू लागलो पण मला एकटेपणातून दूर जाण्याचा मार्ग मोबाईल मधून मिळालेला नाही आणि मला तेव्हा असं कळलं की, मोबाईल काही वेळेपर्यंतच किंवा अधिक वेळेपर्यंत समाधान देतो पण त्याचा दुष्परिणाम सुद्धा आपल्यावर होतो आणि आपल्याला मोबाईलची सवय लागलेली नाही आहे तर आपण एकटेपणात असताना एकटेपणा दूर करण्यासाठी किंवा मन रमवण्यासाठी मोबाईलचा अति वापर करतो आणि असं होत असताना आपला खूपसा महत्त्वाचा वेळ वाया जातो आणि आपल्याला कळत सुद्धा नाही.

एके दिवशी महाविद्यालयांमधून राष्ट्रीय सेवा योजनेचा पाच दिवसीय निवासी शिबिर आयोजित करण्यात आला हा निवासी शिबीर ग्रामीण भागात आयोजित केला होता. यामध्ये मी सहभागी झालो आणि त्यावेळेस माझी प्रकृती पण ठीक नव्हती तरीपण मी कसा बसा करून निवासी शिबिराला गेलो आणि या शिबिरामध्ये एवढा रमून गेलो सगळे हळू-हळू मित्र बनू लागले पाच दिवस सगळे विद्यार्थी सामूहिकपणे राहिले आणि असं होत असताना माझी प्रकृती आपोआप ठीक झाली. माझ्या स्वास्थ विषयक समस्यांमध्ये सुधार झाला, एकटेपणातून सुटका झाली, मोबाईलचा अतिवापर बंद झाला आणि मला कळलं की समूहात खूप शक्ती असते म्हणजेच समूहामध्ये राहिल्याने नैसर्गिकरित्या आपला मन रमते किंवा मनाला शांती मिळते आणि आपली प्रकृती तर ठीक होतेच पण कधी नैराश्य नाही येत, मानसिक बीमारी दूर होते आणि जर का आपण समूहामध्ये नेहमी हसत खेळत असलो तर आपल्या शरीरावर खूपच चांगला परिणाम पडतो आणि आपण स्वस्थ निरोगी राहतो असं मी निवासी शिबिराच्या काही दिवसात किंवा कालावधीमध्ये एकटेपणा आणि समूहामध्ये राहण्याचा अनुभव घेतलं आहे.

माझे व्यक्तिगत असे मत आहे की, एकटेपणा मानसिक बिमारीच असतो जी नैराश्य आणि अधिक चिंता केल्यास व्यक्तीला आतून गिळत जातो. मग आपलं डोकं दुखायला लागतं, खानपानाकडे दुर्लक्ष होतं मग याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो आणि यामुळे आपली जीवनशैली बिघडते.


मला असं वाटते की अधिक वेळेपर्यंत एकटेपणात राहिलं तर व्यक्ती मानसिक रोगी होऊ शकतो. माझ्या मते एकटेपणाचे दोन प्रकार पडतात.


१) ध्यान करण्यासाठी एकटेपणात राहणे : जर का आपण स्वतःचं मन, शरीर किंवा स्वतःला समजून घेण्यासाठी चिंतन आणि एकटेपणात ज्ञान अर्जित करत असून किंवा स्मरणशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत असून तर ह्या एकटेपणाचा परिणाम आपल्या मनावर, बुद्धीवर, शरीरावर चांगला होतो.


२) उदास, नैराश्य आणि अधिक चिंता करणे या सगळ्यांचा एकटेपणा : तर एखादा व्यक्ती एकटेपणात उदास, नैराश्य आणि अधिक चिंता करत असेल तर हा एकटेपणा व्यक्तीला मानसिक रोगी बनवतो.


आपण जर समुहा मधे राहिलं तर आपली मानसिकता चांगली आणि वाईट सुद्धा होऊ शकते, पण ते आपल्यावर निर्भर करते की आपणं कोणत्या विचारसरणीच्या व्यक्तींमध्ये किंवा समूहामध्ये एकत्रित आहोत म्हणजेच स्वतःवर वाईट गोष्टींचा परिणाम न होऊ देता, चांगल्या गोष्टींचा प्रभाव पडू द्यायला हवं तरच आपली मानसिकता चांगली राहणार असं माझ्या शिबिराचे काही कालावधींच्या अनुभवातून मी सांगू इच्छितो.

धन्यवाद !

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts