जिकडे - तिकडे धिंगाणा's image
Love PoetryPoetry3 min read

जिकडे - तिकडे धिंगाणा

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske September 3, 2021
Share0 Bookmarks 64 Reads0 Likes

जाळ कुठे तर धूर कुठे

खोटे -नाटे किती बोभाटे ?

धिंगाणा - धिंगाणा धिंगाणा

जिकडे - तिकडे धिंगाणा

 

महागाई बेकारी ना रोजीरोटी

तू तू मी मी, हमरी तुमरी

धिंगाणा - धिंगाणा धिंगाणा

जिकडे - तिकडे धिंगाणा

 

मूठभर लोकांची मिरासदारी

लोकशाहीचा राजा सदैव भिकारी

धिंगाणा - धिंगाणा धिंगाणा

जिकडे - तिकडे धिंगाणा

 

हा म्हणतो तू चोर ,तो म्हणतो तसाच

कळेचना कुणाला काय करावं, कस जगावं ?

धिंगाणा - धिंगाणा धिंगाणा

जिकडे - तिकडे धिंगाणा

 

ज्याच्या हाती ससा तोच पारधी

मरणाचेही भांडवल करणारे गारदी

धिंगाणा - धिंगाणा धिंगाणा

जिकडे - तिकडे धिंगाणा

 

त्यांचेच झेंडे अन त्यांचेच दांडे

फोडा- फोडी झोडा -झोडी रात्रंदिनी

धिंगाणा - धिंगाणा धिंगाणा

जिकडे - तिकडे धिंगाणा

 

मांणस उपाशी कुत्र्यांना मात्र

कशी बिस्किटांची न्याहारी ?

धिंगाणा - धिंगाणा धिंगाणा

जिकडे - तिकडे धिंगाणा

 

साचलेल्या डबक्यात डराव- डराव

हमारी बिल्ली , हमको म्याव ?

धिंगाणा - धिंगाणा धिंगाणा

जिकडे - तिकडे धिंगाणा 

 

अंधभक्तांची फौज,संधिसाधुची मौज

आधाराची काठी कोण होणार? कधी

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts