
अरे जनाची नसेल तर मनाची थोडी धरा
भ्रष्टाचार बोकाळलाय बेरोजगारी वाढली
वरून जीवघेणी महागाई गरिबांनी जगावं कसे ?
नालायक संधीसाधू बगळे डोमकावळे अन भित्रे ससे
नको आम्हाला रोजीरोटी रोजगार नोकरी आता
नकोच दर्जेदार शिक्षण रोटी कपडा नी मकान
बरे आम्ही सडक छाप भाई दीडदमडीचे कसाई
अमक्या तमक्या पक्षाचा झेंडा अन दांडा होऊ बिनधास्त
स्वतःचच भविष्य अंधारात अन म्हणे तेच आमचे आश्रयस्थान
उभरते नेतृत्व भाग्यविधाते त्यांच्या साठी वाट्टेल ते करू
त्यांचे मुले परदेशात शिकतात तुम्ही फालतुपणा करून
केसेस डोक्यावर घेऊन वरातीत नाहीतर मोर्चेसाठी झेंडे घेऊन
कधी कळणार आम्हाला त्यांचे कावे षडयंत्र ?
कुठवर धावणारं त्यांच्यापाठी झेंड्यांचेदांडे होऊन
का थकत नाही जिव्हा आमची त्यांची खोटे गौरवगान गाऊन
कसे घडणार आपले भविष्य आपुले कधी कळणार जाबदाऱ्या ?
बंद करा रे हुजरेगिरी आणि दिडदमडीची चाकरी
माणूस आहात तुम्ही नाहीत रे पाळीव प्राणी
फेकल्या तुकड्यावर जगणारी पाट्टेवाली जमत नका रे होऊ
उद्याच्या भारतवर्षांचे भविष्य तुम्ही ,सुकर जगण्याची दया हमी
No posts
No posts
No posts
No posts
Comments