उद्याचा दिवस फक्त आणि फक्त तुझाच असेल ..'s image
Poetry1 min read

उद्याचा दिवस फक्त आणि फक्त तुझाच असेल ..

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske May 19, 2022
Share0 Bookmarks 14 Reads0 Likes

 

 

गच्चं आभाळ भरून आलंय

कंठात दाटला प्राण जसा

हरवल्या कुठे त्या दाहीदिशा

पदरी आली दुर्गती ,घोरनिराशा

 

नियतीचा खेळ म्हणावा की अपयश 

की केवळ वास्तविक संघर्षमय वारसा ?

कुठे चुकलो आपण ,की भोवला अट्टहासही 

शोधूनि थकलो उत्तर ,चल जाऊ दे लढू पुन्हा 

 

ऋणानुबंध कसले त्या गावाशी असो नसो

दरवेशागत पुन्हा नशिबी नवा गाव नवा रास्ता

टिपायचे होते दोन चार दाणे इथे तिथे कुठेही

आहेतच रस्त्याला रस्ते मिळत जाणारे ...

 

 

खूप समजावलं वेड्या मना , कुणी नसत कुणाचं

चल रे दोस्ता व्यर्थ न चिंता तुझा तूच हो दिलासा

फिनिक्स होऊन घे राखेतून भरारी उंच - उंच नभी

उद्याचा दिवस फक्त आणि फक्त तुझाच असेल ... 

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts