तूच माझी प्रीत सखी's image
Love PoetryPoetry1 min read

तूच माझी प्रीत सखी

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske March 27, 2022
Share0 Bookmarks 31 Reads0 Likes

तूच माझी प्रीत सखी

सूर ताल अन लयही

तूच विराणी , प्रेमकथा

अन तू नसण्याचं भयही ...


तूच माझी व्यथा वेदना

तुजविण मी अधुरा ग

तूच माझी ग चित्रकथेतील

प्रेयसी ,मैत्रीण ,सर्वकाही 


तूच जगण्याचा बहाणा 

सुंदर संस्कृती कलाकृती

तू प्रेमळ ,सालस भावभिनी

अंत्य मध्य अन आरंभही ...


तूच आशा -निराशा ,वैशाख वणवा

असह्य अनाकलनीय कहर तू

पानझड अन वसंताचा बहर तू

नवचेतना जागवण्यास तन मना

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts