तिला थांबवायला हवं होतं's image
Poetry2 min read

तिला थांबवायला हवं होतं

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske May 7, 2022
Share0 Bookmarks 36 Reads0 Likes

काल अचानक ती भेटली मज पुन्हा नाक्यावर 

इतक्या दिवसांनंतरच्या भेटीत नेमकं काय घडलं 

भावविभोर क्षण ते शब्दाच्या चिमटीत न मावणारे 

संमिश्र भावना ,अनामिक भीती कि अतीव आनंद 


नजरेस नजर भिडता स्तब्ध दोघेही  

ती धोडीसी बावरली नंतर पुन्हा सावरली 

क्षणभर बोलावं की नाही संभ्रमात ती ही 

मी अरे तू इकडे कशी ? इतक्या दिवसांनी 


हो त्या तिथे पलीकडे सोसायटीत राहते मी 

अनिच्छेने बोलती झाली पण थकलेली जाणवली 

मी ही अच्छा या अगोदर दिसली नाहीस कधी ?

मी हीच का ती वादळासारखी मला भेटलेली अबोल का 


ती म्हणाली येऊ का आई वाट पाहत असेल 

हो भेटूया पुन्हा कधीतरी मी म्हटलं जाणूनबुजून 

तशी ती चालती झाली तिच्या पाठमोऱ्या आकृतिकडे 

मी पाहत राहिलो गर्दीत दिसेनासी होईपर्यंत ... 


ती कशी असेल ? का मनमोकळ बोलली नसेल 

ती सुखात असेल ? आईसोबत राहते म्हणाली म्हणजे 

मुलं बाळ घर संसार सोडून आईसोबत का बर राहत असेल ? 

तिच्याविषयी वाटणारी चिंता, सहानुभूती, प्रेम की आपुलकी   


मनात प्रचंड काहूर माजलं होतं चुकलंच आपलंही 

तिला थांबवायला हवं होतं सर्वकाही जाणून घ्यायला हवं होत 

आज इतक्या वर्षांनीं भेटली होती झालं गेलं विसरून जा म्हणावं 

दुभंगणलेल्या मनाचं जाळं पुन्हा एकदा गुंफायचं होत निस्वार्थ निरागस नातं 

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts