
Share0 Bookmarks 48 Reads0 Likes
तिला आज विचारायचं ठरवलंय
होऊन जाऊ दे एकदाचा सोक्षमोक्ष
त्यात काय एवढं नाही तर नाही
होकार असेल तर दुधात साखर
तिला आज विचारायचं ठरवलंय
सांग तुझा होकार नकार काहीही
शेवटचंच तू नही तो और सही
नकोच ते भिजत घोंगडे लाख बहाणे
तिला आज विचारायचं ठरवलंय
असेल मनात ते सांगून टाक म्हणेन
केवळ प्रेम मैत्री की जीवनसाथीही
म्हण जे काही असेल ते सरसावंध असेल
तिला आज विचारायचं ठरवलंय खरं
पण वेळ आली तेंव्हा कळलं अवघड सारं
ती समोर येता धडधडली छाती अनामिक भीती
मुद्याचं सोडून असंबद्ध बरळलो काहीबाही ...
तिला आज विचारायचं ठरवलंय खरं
त्वचेलाही फुटेल वाटलं शब्दांची धुमारे
जणू शब्दच माझे ओठांवर थिजले
क्षणार्धात होत्याचे नव्हते जे ठरवले बोलायचे ते
No posts
No posts
No posts
No posts
Comments