ती म्हणाली तुझं माझ नातं काय ?'s image
Poetry2 min read

ती म्हणाली तुझं माझ नातं काय ?

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske April 15, 2022
Share0 Bookmarks 40 Reads0 Likes

ती म्हणाली तुझं माझ नातं काय ?

मी चेष्टेनेच म्हणालो जखमा अन उपाय 

ती -प्रत्येकवेळी रे तुला कशी थट्टा सुचते ?

तूच समस्या अन तूच निराकरण असतेस 


ती म्हणाली मी होते म्हणून निभावलं तुझं ... 

मी थट्टेने म्हणालो तूच संभाळालस म्हण ना 

ती रडवेली होऊन जाऊ दे तुला काय त्याच ?

बरं बाबा चुकल आमचं घडलं महाभारत आम्हामुळेच 


ती म्हणाली तुम्ही पुरुष ना इथून तिथून सारखेच ..

मी म्हणालो ते कसे काय ? समजून सांग ना थोडेसे 

ती रागानेच म्हणाली सर करून सावरून तुम्ही नामानिराळे 

मी म्हटले तसं नाही ग स्त्री पुरुष संसाररूपी रथाचे दोन चाके ती म्हणाली तुम्ही पुरुष ना एक नंबरचे स्वार्थी संधीसाधू ..

मी म्हणालो स्त्री पुरुष संम- समान नाण्याच्या दोन बाजू 


ती म्हणाली तुझं माझं जमेना अन माझ्यावाचून करमेना ..

मी म्हणालो हवं तर तस समज मानला देव नाही तर दगड 

ती म्हणाली तुम्ही प्रत्येकवेळी आपलच खर करणार हे नक्की 

मी म्हणालो धान्याला बिचाऱ्याला नसे सुटका जातं असो कि चक्की 


ती तुम्ही पुरुष दुराभिमानी समजता आम्हाला उपभोग्य वस्तू ..

मी - नाही गैरसमज आहे तुझा तुजविण जीवन माझे आधू 


ती म्हणाली तुम्हा पुरुषाना एवढं मात्र चांगलं जमतं ..

मी जाऊ दे ग आम्ही कसेही असलो तरी कुठे बिघडतं 

ती म्हणाली स्त्रीशिवाय पुरुष सुखी होऊ शकत नाही मान्य ?

सुख हे शेवटी आपल्यावरच अवलंबून असत ग मानणं न मानणं  

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts