शब्दांच्या दुनियेत's image
Poetry2 min read

शब्दांच्या दुनियेत

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske March 1, 2022
Share0 Bookmarks 19 Reads0 Likes

शब्दांच्या दुनियेत हरवलेला 

मी ही एक शब्दवेडा निसंकोच 

अंगप्रत्यंगात भिनतात शब्द

लाव्हारसाप्रमाणे बाहेर पडू पाहतात 


शब्द झिरपत जातात मना - मनात 

चराचर सृष्टीतील अनुपम प्रेमं  

न्हाहून निघतात बिनदिक्कत 

रोमा- रोमात भिनतात वेळीअवेळी 


शब्दांच्या दुनियेत हरकून जातो जीव 

येते स्वतःचीच कीव पठारावस्थेत 

अन अचानक वादळासह सर यावी 

अगदी तसच शब्द प्रसवतात कागदावर 


शब्दांच्या दुनियेत भांबावून जातो मी 

काही लिहू काय वाचू होऊन जात तेंव्हा 

शब्द सभोवताली फेर धरून नाचू लागतात 

वाकोल्या दाखवूंन हिणवतात कधी कधी 


शब्दांच्या दुनियेत मी एक नवखा असतो 

जिकडे जावे तिकडे शंब्दांचा गाव 

दुःख, वेदना , द्वेषाने पछाडलेला तर 

कधी प्रेम वात्सल्याने ओतप्रोत निरागस भाव शब्दांच्या दुनियेत थकायला होत कधी कधी 

तर भयंकर उदासी निष्क्रियता भिनते मनात 

अन अचानक आतला आवाज ऐकू येतो 

त्वचेलाही फुटेल वाटत शब्दांची धुमारे No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts