राजेहो ! भ्रमाचा भोपळा फुटनार कधी ?'s image
Poetry1 min read

राजेहो ! भ्रमाचा भोपळा फुटनार कधी ?

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske February 19, 2022
Share0 Bookmarks 26 Reads0 Likes

इतके कसे आम्ही धर्मभोळे नी

अंधभक्त सारे ,इतकी गुलामी ?

आम्हाला समजली लोकशाही

ना समजली आपली जबाबदारी


भाषा , प्रांत , जात धर्मात विभागलो

पक्षाच्या झेंड्यानी बुजगावणे झालो कधी

त्यांच्याच दांड्याने बडवले गेलो ,

सिस्टमच्या चक्कीत भरडला गेलो


आम्ही राजे होतो लोकशाहीचे

नावापुरतेच उरलो आता नागरिक

टीचभर पोटाची खळगी भरते ना

ना मिळते अंगभर कपडे,दर्जेदार शिक्षण


भ्रष्टचार बोकाळला तशी बेकारी महागाई

स्वातंत्र्याची सत्तरी ओलांडली जरी

गरिबी संपली ना श्रीमंतांची मुजोरी

राजेहो ! भ्रमाचा भोपळा फुटनार कधी ?

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts