
Share0 Bookmarks 39 Reads0 Likes
तो होता प्रियकर भाबडा प्रेमवेडा
तो स्वप्नाळू ,ती होती बिप्रॅक्टिकल
तो आणि ती जिवलग मित्र नक्की पण
त्याने तिला धरले गृहीत नेहमीच
ती होतीच काकणभर सरस
हा उगाच पाठीमागे होता फिरत
ती समजत होती त्याला टाईमपास
याचा न्य्याय उफराटा सर्वाहूनी न्यारा
नाही समजलं त्याला कधी
प्रेम हे दोन मनाचं मधुर मिलन
प्रेम म्हणजे देवघरचं देणं
प्रेम म्हणजे त्याग समर्पण
ती गेली परागंदा झाली
तो ही झाला मग देवदास
तिने थाटला संसार दुसरा
हा आयुष्यातून उठला कायमचा
लाख केल्या त्याने खटपटी ,राडा
शेवटी ती मिळाली न तिचं प्रेम
तो मारत राहिला गमजा हवेत
चुकला न त्याला प्रेमाचा हेलपटा
No posts
No posts
No posts
No posts
Comments