प्रेम कुणी कुणावर करावं's image
Poetry1 min read

प्रेम कुणी कुणावर करावं

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske March 1, 2022
Share0 Bookmarks 36 Reads0 Likes

प्रेम कुणी कुणावर करावं

का आणि कसं करावं

प्रेम करावं की न करावं

असो ज्याचा त्याचा प्रश्न 

 

प्रेम कुणी कुणावर करावं

आभासी मृगजळावर की

मनगटाच्या बळावर करावं

सुळावरच्या पोळीवर करावं 

 

 प्रेम कुणी कुणावर करावं

मिरचीच्या खळ्यावर करावं

भ्रमाच्या भोपळ्यावर करावं

मरणाच्या सापळ्यावर करावं

 

 

प्रेम कुणी कुणावर करावं

ताणलेल्या बाणावर करावं

आशिर्वादाच्या हातावर करावं

घडी पाहून गुढी उभारावी

 

प्रेम कुणी कुणावर करावं

चिखलातील कमळावर करावं

संधीसाधू बगळ्यावर करावं

धूर सोडणाऱ्या इंजिनावर करावं

 

प्रेम कुणी कुणावर करावं

खेळ कळणाऱ्यावर करावं

मेळ बसवणाऱ्या ढोलक्यावर करावं

मायावी बोलक्या बाहुल्यावर करावं


No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts