प्रेम हे देवाघरचे देणे's image
Poetry1 min read

प्रेम हे देवाघरचे देणे

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske March 23, 2022
Share0 Bookmarks 19 Reads0 Likes

प्रेम हे देवाघरचे देणे

प्रेम सौभाग्याचे लेणे

प्रेम परस्पराशी एकरूप होणे

प्रेम म्हणजे समजून घेणे


प्रेम एक जिवंत संवेदना

प्रेम हळुवार नाजूक भावना

प्रेम म्हणजे भावनांचा कल्लोळ

प्रेम म्हणजे आकर्षणाचं मोहोळ प्रेम म्हणजे परस्परांशी असलेली ओढ

प्रेम म्हणजे लीलया राधेशाम गोड

प्रेम मेंदूची कधीच न मोडणारी खोड 

प्रेम चिरंतन ,शाश्वत भावना अजोड 


प्रेम म्हणजे माया ,वात्सल्य

प्रेम म्हणजे स्वागत सुहास्य 

प्रेम म्हणजे सुगंधाची दरवळ

प्रेम हेच जीवन ,सुखाची हिरवळ


प्रेम म्हणजे निस्वार्थ नाते

प्रेम ऋणानुबंध जन्मांतरीचे

प्रेम म्हणजे सुरेल गीत प्यारे

प्रेम हेच जीवनगाणे ... 

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts