पाऊस's image
Share0 Bookmarks 43 Reads0 Likes

हा पाऊस वेडा झाला

रिमझिम बरसला केंव्हा

धुव्वाधार येऊनी गेला

बैल गेला अन झोपा केला

 

 

हा पाऊस वेडा झाला

धो धो बरसला कधी

निकड होती तेंव्हा

तोंड काळं करुनि गेला

 

हा पाऊस वेडा झाला

पुढा-यागत लहरी झाला

आश्वासक झाला परंतु

दुःखच देऊनी गेला

 

हा पाऊस वेडा झाला ...

जाताना वाकोल्या दाखवून गेला

ते येतात सुगीच्या दिवसात

अन तू वेळी अवेळी केंव्हाही

 

 

हा पाऊस वेडा झाला

आलास तेंव्हा घरचाच झालास

छाताडावर नाचलाच जसा

होत्याच नव्हतं क्षणार्धात

 

 

हा पाऊस वेडा झाला ...

वागतो का असा जाणून बुजून

आधीच का थोडी संकटे इथे

अन तुझे हे अतातायी वागणे 

 

हा पाऊस वेडा झाला

स्वप्न भंगले , देह खंगले

काय मिळत रे तुला असे वागून

अगोदरच मेलेल्या पुन्हा मारून ?

 

हा पाऊस वेडा झाला

असा कसा रे तू वेंधळा

येतोस जातोस स्वमर्जीने

असून अडचण नसून खोळंबा 

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts