ओढ तुझ्या भेटीची's image
Poetry1 min read

ओढ तुझ्या भेटीची

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske May 20, 2022
Share0 Bookmarks 213 Reads0 Likes


मन आतुर , सपशेल फितूर 

मन ओढाळ कधी चिंतातुर 

वास्तवात असो या असो स्वप्नात 

पण ओढ तुझ्या भेटीची ... 


तू माझ्यासाठी खास की केवळ भास 

आठवणीत तुझ्या हुंकारतो प्रत्येक श्वास 

रात्रंदिनी उठता बसता येते आठवण हमखास 

कुणास ठाऊक कशी पण ओढ तुझ्या भेटीची ..


आज इतकी वर्षे झाली तरी तुला विसरलो 

ना तुझ्या प्रेमळ लोभस , जीवघेण्या आठवणी 

खूपदा वाटलं मुळासकट फेकून द्यावयात त्या 

पण तसूभरही कमी झाली नाही ओढ तुझ्या भेटीची .. . 


तीच ओढ जुनीच खोड आठवणीत हरवण्याची 

तू दिलेल प्रेम विरह वेदना व्याजासकट परत कराव्या

आठवणींची शिदोरी पुरून उरते ,सरते ना कधी 

वास्तवात नाही तर स्वप्नात का होईना ओढ तुझ्या भेटीची .. 

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts