मी तू अन पुस्तक's image
Poetry2 min read

मी तू अन पुस्तक

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske March 29, 2022
Share0 Bookmarks 39 Reads0 Likes

मी तू अन पुस्तक गट्टी कधी जमेल का ?

जीव माझा वेडापिसा प्रेमासाठी तसे ध्येयही

दोघेही मजसाठी तितकेच जवळचे

तूच सांग ना रे टाळू मी कुणाला ?


प्रश्न निरंतर भाबडा पण खरा

तू आयुष्याचा जोडीदार मान्य परंतु

माझी ही आहेत रे खूप काही स्वप्न

अस्तित्व सिद्ध करण्याची अपरिहार्यता


तुझा निर्णय ठाम जणू काळ्या दगडावरची रेघ

तशी मीही आईबाबाच छोटसं जगच ना रे

मी तरी काय करू रे धरलं तर चावत अन

सोडलं तर पळत बेभान मन सैरभैर संभ्रमित


कधी वाटलं नव्हतं रे तू अन पुस्तक परस्पर विरोधी

मुलगी कितीही शिकली तरी परावलंबीच असते

तिनं रुजाव कुठल्या जमिनीत अस्तित्व मन नसत ?

का म्हणून तडजोड करावी आम्हीच दरवेळी ?


खूप वाटत रे मलाही शेवटपर्यंत साथ द्यावी तुझी पण

त्यासाठी मी माझ्या स्वप्नाची राखरांगोळी कशी करू ?

तूच सांग ना स्त्री पुरुष समानता फक्त कागदावरच का ?

तुमचं तत्वज्ञान ऐन वेळी फोल ठरत ?सारे कसे इथून तिथून सारखेच

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts