मी सागर गहिरा's image
Poetry1 min read

मी सागर गहिरा

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske March 27, 2022
Share0 Bookmarks 12 Reads0 Likes

मी अवघड घाट अन

तू नागमोडी पायवाट

मी सागर गहिरा

तू मिलनोत्सुक सरिता


मी झंझावती वादळ प्रिये

तू वाऱ्याची मंद झुळूक

मी व्यथांचा बाजार मांडला

तू खंबीरपने संसार केला


चूक तुझी नव्हतीच मुळी

मीच होतो भित्रा ससा

तू सोज्वळ अन सहनशील

गाफील हेकेखोर मी थोडासा


मी तुझा घात केला न थयथयाट

तू फक्त वास्तवाचा स्वीकार केला

मी होतो स्वप्नाळु ध्येययवेडा

तू मानिनी ,सौदामिनी स्वयंमसिद्धा

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts