महत्वाचे प्रश्न दूर ठेवून's image
Poetry1 min read

महत्वाचे प्रश्न दूर ठेवून

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske March 18, 2022
Share0 Bookmarks 16 Reads0 Likes

अरे त्याचंच खाऊन म्हणता कसे

लाभार्थी त्याला बिनदिक्कत बिनधास्त

कालपर्यंतचा लोकशाहीचा राजा आता

पारध झालेले जणू काय भित्रे ससे


ज्यांच्या जीवावर निवडून आले

त्यांनाच म्हणतात आम्ही हे दिलं ते दिलं

सत्तेसाठी वाट्टेल ते म्हणत कारभारी झाले

कोण कोणासाठी कधी कसे रक्त ओकून मेले


महत्वाचे प्रश्न दूर ठेवून

चालवतात पांगळे शासन

मूठभर तांदूळ गहू वाटून

फेडा म्हणतात आमचं ऋण


जणांची नसेल कदाचित मनाची थोडी धरा

अमका मुक्त भारत तमका मुक्त प्रदेश 

जनता बिचारी हवालदिल अन तुम्ही मात्र

एकमेकांवर करून कुरघोडी करण्यात दंग 


जात धर्म प्रादेशिकतेतून झगडे काही टळेना

दंगे - धोपे पेटवून सत्तेची पोळी भाजने

स्वातंत्त्र्याची पंच्याहत्तरी ओलांडली तरी

सकलाना अन्न, वस्त्र , निवारा काही मिळेना

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts