लिहत रहावं कुवतीनुसार शेवटापर्यंत ...'s image
Poetry2 min read

लिहत रहावं कुवतीनुसार शेवटापर्यंत ...

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske February 16, 2022
Share0 Bookmarks 13 Reads0 Likes

मी कोण ? का लिहतो कशासाठी ?

जगण्याची लढाई कि कुणावर चढाई ?

कुणी वाचतो ? का म्हणून नसती आफत

उगाच लिहत राहिलो काहीबाही ...

का कुणास ठाऊक कधी उमगलेच नाही

 

स्वत :ची लढाई अवघड होऊन बसलीय

तरीही सभोवतालचे दुःख वेदना बोलावतात

तर कधी मानवतेचे शिपाई जणू बोलावतात

चला एक हॊउया पुन्हा... म्हणून म्हणतात

का वाटते लिहल पाहिजे खटकलं, भावलं ते  

 

मी कोण ? कशासाठी जगतो आहोत ?

कुणासाठी लढतो आहोत ,धडपडतो आहे

काही - काही कळत नाही तरीही ...

जगतो आहोत दिशाहीन नियतीच्या भरवशावर

सत्य- असत्य, धर्म -अधर्म मांडाव कुवतीनुसार

 

कधी - कधी वाटत कशाला हे उपद्व्याप

आ बैल मुझे मार ,दुश्मनी सुमार ठरलेली

काय फरक पडतो लिहल्याने - वाचल्याने

जगरहाटी चालूच आहे मागल्याप्रमाणे

संत ,सुधारकही थकून गेले आपली काय बिशाद ?

 

पुन्हा आतला आवाज ऐकू येतो ऊठ जागो हो

क्रांतीचा धागा हो तुला लढायला हवे मांडायला हवे

बिनधास्त भलेही क्रांतीचा सूर्य नाही होता आलं तरी

नंदादीप बनून तेवत राहावं अंधाराशी लढत राहावं

लिहत रहावं कुवतीनुसार शेवटापर्यंत ...

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts