लिहलयं काही तुझ्यासाठी's image
Poetry2 min read

लिहलयं काही तुझ्यासाठी

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske April 11, 2022
Share0 Bookmarks 34 Reads0 Likes

लिहलयं काही तुझ्यासाठी

भावविभोर मनाच्या गाभाऱ्यातून

तू गेलीस तेंव्हा म्हणालो खुशाल जा पण

आजही स्मृतीत उरलीस का माझ्यासाठी ?

 

लिहलयं काही तुझ्यासाठी

मनाला भावलेलं खटकलेलं

शब्दातीत भावनांच्या पलीकडले

सल तू आजही माझ्यासाठी

 

लिहलयं काही तुझ्यासाठी

नाही राहवत म्हणून

समजू नकोस गडे

तूच फक्त ध्येय माझ्यासाठी

 

लिहलयं काही तुझ्यासाठी

तुला बर वाटो कि खर वाटो

खोट वाटो की नाटकी लिहीनच मी

 नाही कुणासाठी तर माझ्यासाठी

 

लिहलयं काही तुझ्यासाठी

कदाचित तू वाचणारही नाहीस

माहितेय मला माझा अट्ट्हास नाही

लिहल्य मी रसिक मायबापासाठी

 

लिहलयं काही तुझ्यासाठी

काहीतरी लिहणारच होतो

त्यात तुझंही एक पान होतं

महत्वाचं आयुष्यात माझ्यासाठी

 

लिहलयं काही तुझ्यासाठी

कारण ऋणानुबंध असावेत

तुझे माझे जे काही नाते होते

ते तितकेच हवेहवेसे माझ्यासाठी

 

लिहलयं काही तुझ्यासाठी

तस पाहिलं तर लिहून नये मी

असं काही भव्य दिव्य घडलंच नाही

आयुष्यात तू काय केलस माझ्यासाठी

 

लिहलयं काही तुझ्यासाठी

पण तू नसल्याची उणीव तर आहेच

खंत अन खेदही तितकाच असावा

असं काय केलस तू माझ्यासाठी

 

लिहलयं काही तुझ्यासाठी

तुझं राग येतो ना कसली सहानुभूती

कारण तू आलीस जीवनात एक

अपघात तर होतीस माझ्यासाठी

 

 

लिहलयं काही तुझ्यासाठी

पण कुठल्या निर्णयापर्यंत जाऊ

तुला प्रेम म्हणू कि मैत्रीण म्हणू

की आणखी कोण तू माझ्यासाठी

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts