कळेचना मजला हे कसले प्रेम's image
Poetry2 min read

कळेचना मजला हे कसले प्रेम

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske March 2, 2022
Share0 Bookmarks 16 Reads0 Likes

कळेचना मजला हे कसले प्रेम

निस्वार्थ निरागस अनाकलनीय

कुणी सांगावं एकतर्फी असावं बहुदा

तीच वोढ जुनीच खोड पुन्हा नव्याने


इतकी वर्ष झालीय आता त्या घटनेला

पण अगदी कालपरवा घडल्यागत

ताजीतवानी का मग वाटते आजही

तस तुझं प्रेम होत नव्हतं एक कोडंच


पण आजही तेच आकर्षण तुजविषयीची

ओढ प्रेम जिज्ञासा तसूभरही कामे होत नाही

तासंन तास बघत बसावं वाटत तसबिरीकडं

याला वेड म्हणावं कीमनाची न मोडणारी खोड


तुला माझ्याविषयी काय वाटतं तूच जाणे

पण का कुणास ठाऊक तुला भेटावसं वाटतं 

भरभरून बोलावसं वाटतं तू कायम तिरस्कार

केलास, हेटाळणी केलीस वेळोवेळी तरीही

कळेचना हे कसलं प्रेम भरकटलेल बिनबुडाच


म्हणतात ना प्रेमात नी युद्धात सर्वकाही क्षम्य

मान्य परंतु जे पेरलं तेच उगवतं तो नियम ?

का इथे फुजुल ठरतो बुद्धीचा भावनेवर विजय

अन मी सपशेल फेल ,तू कायमच अपराजित 


तस पाहिलं तर तू कायमच माझा तिरस्कार केलाय

अपमान अवहेलना मित्राकडून सहन करावं गपगुमान

आणि तरीही तुजविषयी तेच प्रेम तीच ओढ नव्य जोमाने

का आणि कसं हे प्रेम एककल्ली अनाकलनीय हवंहवंसंNo posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts