
जिकडे तिकडे भोंगेच भोंगे
गल्लीपासून दिल्ली पर्यंत
डीजे असो की वांध्याचा भोंगा
तुम्हीच ओळखा चांद्यापासून बांद्यापर्यंत
कुणी म्हणे हा हटवा तो लावा
तो हटवा हा लावा बिनधास्त वाजवा
कर्णकर्कश निरंकुशपणाने नाचा
जनतेच्या छाताडावर निःसंकोच
भोंगा काय नी डी जे काय
हेच फक्त महत्वाचं आता
बाकी प्रश्न सारे सोडवून झाले
फक्त उरले भोंगेच भोंगे ,अनाकलनीय सोंगे
निवडणुकीचं पीक भरात आलं म्हणजे भोंगे येतात
मुखवटेधारी सोंगे येतात तसे नौटंकीवालेही
भोंगा ज्याने निर्माण केला त्यालाही वाटले नसेल
की इतका हरहुन्नरी जादूचा दिवा हा भोंगा होईल
जनतेचे दुःखच वेदना समस्या विरतात
ह्याच भोंग्याच्या गजबजाटात निःसंदेह
उघड गुपित कुणाला कळू दिला नाही की
आम्ही तेच भोंगे जाणून बुजून वाजवतोय ?
जिकडे जिकडे भोंगेच भोंगे अन
समस्यांना ना वांधेच वांधे असताना
का नाचतोय आम्ही त्यांच्या तालावर ?
वर्षानुवर्षे रात्रंदिनी शामप्रहरी
No posts
No posts
No posts
No posts
Comments