जागतिक कविता दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा's image
Poetry2 min read

जागतिक कविता दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske March 21, 2022
Share0 Bookmarks 39 Reads0 Likes

खरे कवी , खोटे कवी ,कॉपी पेस्ट कवी

चमकू कवी , धमकूं कवी ,साखरवाटी कवी

बाजारू कवी ,पोटभरू कवी ,बेरकी कवी

चोर कवी , थोर कवी हरहुन्नरी कवी

जागतिक कविता दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


नवखे कवी , प्रस्थापित कवी ,विस्थापीत कवी

विद्रोही कवी , सहृदयी कवी , भांडखोर कवी

सरंजामी कवी , दलित कवी ,स्वयंघोषित कवी

स्वावलंबी कवी , परावलंबी कवी,त्सुनामी कवी

जागतिक कविता दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


घमंडी कवी , कुंभांडी कवी ,मनमानी कवी

सनातनी कवी , पुरोगामी कवी, संत कवी

पंत कवी ,महंत कवी ,सिद्धहस्त कवी

वरदहस्त कवी ,निराधार कवी, दुर्लक्षित कवी

जागतिक कविता दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


असलेले कवी नसलेले कवी ,फसलेले कवी, न दिसलेले कवी

झिडकारलेले कवी,पुढारलेली कवी,आत्मकेंद्रित कवी

निनावी कवी ,बहुनामी कवी ,अनामी कवी

ध्येययवेडे कवी , प्रेमवेडे कवी ,पारवेडे कवी

जागतिक कविता दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छाNo posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts