हुकूमशाही राज्य जावे ही श्रींची इच्छा's image
Poetry1 min read

हुकूमशाही राज्य जावे ही श्रींची इच्छा

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske March 24, 2022
Share0 Bookmarks 19 Reads0 Likes


मतलबी ,छल कपटी, हरहुन्नरी राजा

गंडवण्या शोधी फंडे नवे - नवे ...

जनता बिचारी दुखी हवालदील झाली

भीक नको घामाचे दाम हवे ...

हुकूमशाही राज्य जावे ही श्रींची इच्छा


बेकारी , भ्रष्टाचार , महागाई महामारी

चोऱ्या चपट्या , बलात्कार ,लूटमार

लुटारुंच्या टोळ्या नाक्या नाक्यावर

अंध:भक्तांची फौज रक्तपिपासूची मौज

 एकाधिकारशाही राज्य जावे ही श्रींची इच्छा


जात ,धर्म प्रादेशिकता ,समाजात दुही

माजवून सत्तेची पोळी भाजताहेत

खऱ्याच खोटं ,लबाडाचं तोंड मोठं

मी सांगेन तीच पूर्वदिशा माझंच खरं 

तुघलकी फर्मानी राज्य जावे ही श्रींची इच्छा


सत्यावर करून कुरघोडी त्यांनी

असत्याची बांधली माडी बिनधास्त

स्वप्नातला राजकुमार चौफेर उधळला 

चोहीकडे अंध:कार पसरवलाय दिलखुलास 

हिटलरशाही राज्य जावे ही श्रींची इच्छा

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts