घराला घरपण तेंव्हाच येतं ...'s image
Poetry1 min read

घराला घरपण तेंव्हाच येतं ...

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske April 30, 2022
Share0 Bookmarks 27 Reads0 Likes

मायेचं छप्पर आपुलकीची झोपडी 

लाकडाची मोळी, लहानग्यांची झोळी 

प्रेमळ विश्वासाच्या अभेद्य भिंती 

घराला घरपण तेंव्हाच येतं ... 


गजबजलेल घर ,सारवलेलं अंगण 

आजीच्या मांडीवर कुकल हसतं 

लाख समस्या तरी समंजस माणसं 

घराला घरपण तेंव्हाच येतं ... 


धगधगती आग पोटात अन ओठातही 

चुलीत सरपण ,नात्यात समर्पण असेल 

नात्यांची घट्ट वीण तसूभरही कमी नसेल 

घराला घरपण तेंव्हाच येतं ... 


त्याग समर्पण ,प्रेम आपुलकी माया 

थोरामोठ्यांच्या आशीर्वादरूपी छाया 

सारं काही जिथल्या तिथं असतं 

घराला घरपण तेंव्हाच येतं ... 


घर असत घरासारखं प्रत्येकाचं आदर्श 

कर्तव्य तत्पर ,अटी शर्ती काही नसतं 

कुणाला जन्नत ,कुणाला नंदनवन भासतं 

घराला घरपण तेंव्हाच येतं ... चार पिढ्याच ऋण डोईवर घेत 

चिमुकलं बाळ प्रेमात न्हात 

थकलेलं जोडपं समाधानी तृप्त  

घराला घरपण तेंव्हाच येतं ... 

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts